Dehu news : कर्तव्य फाऊंडेशनतर्फे गरजूंना अन्नदान उपक्रम

Pckhabar- कर्तव्य फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कै. कु. अक्षय सतीश अगरवाल यांच्या स्मरणार्थ देहू पंचक्रोशीतील आश्रित, लाॅकडाऊन बाधित कष्टकरी, हातावर पोट असणारे कामगार व कोरोनाबधित गृहविलगीकरणातील कुटुंबांसाठी अन्नदान उपक्रमास आज (सोमवार) सुरुवात करण्यात आली.
या उपक्रमाचे उदघाटन देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे, एपीआय शाहिद पठाण, डॉ. कांबळे सर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी, नेत्रतज्ज्ञ डॉ. किशोर यादव, उद्योजक सतीश अगरवाल यांच्या हस्ते झाले.
हे अन्नदान रोज दुपारी 12.30 ते 2 या कालावधीत सुरु राहणार आहे. पहिल्याच दिवशी 127 नागरिकांनी या अन्नदानाचा लाभ घेतला.
कर्तव्य फाउंडेशन देहूचे सदस्य पुरुषोत्तम भालेकर, सुभाष चव्हाण, आकाश अगरवाल, निखिल अगरवाल, ऋषीं भोईर, ईश्वर मोरे, कौस्तुभ निंबाळकर, केतन हिरवे, अक्षय भालेकर, श्रीकांत लगाडे यावेळी उपस्थित होते.










Leave a Reply