Pimpri Corona news:  काय सांगता!  एकाच दिवशी 5 हजार 374 जण कोरोनामुक्त 

Pimpri Corona news: 
काय सांगता!  एकाच दिवशी 5 हजार 374 जण कोरोनामुक्त
कोरोनाचे 641 नवे रूग्ण,
Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रूग्ण संख्या चांगलीच कमी झाली आहे. अडीच-ते तीन हजारांच्या आसपास गेलेली रूग्ण संख्या एक हजाराच्या आत आली आहे. तर शनिवारी एकाच दिवशी तब्बल 5 हजार 374 जणांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शहरवासियांना दिलासा मिळाला आहे. महापालिका हद्दीत 641 नवे रूग्ण आढळले आहेत. 42 जणांचा मृत्यू झाला आहे.

शहरात आत्तापर्यंत 2 लाख 46 हजार 54 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 2 लाख 34 हजार 392 जण कोरोनामुक्त झाले आहेत.  शहरात महापालिका हद्दीत 28 तर हद्दीबाहेरील 14 जणांचा मृत्यू झाला आहे. 7 हजार 358 संशयित रूग्ण दाखल करण्यात आले.

2 हजार 487 घरांना भेटी देऊन 9 हजार  124 व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहरात मेजर कन्टेंन्मेंट 217 असून सुक्ष्म कन्टेन्मेंट झोन 1 हजार 549 करण्यात आले आहेत. शहरात 4 लाख 73 हजार 385 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *