Poem By Prasad Handore : कोरोनाने शिकवले..

Poem By Prasad Handore : कोरोनाने शिकवले..

Pckhabar-घेता लेखा जोखा
गत दोन वर्षांचा…
काय दिले कोरोनाने
हे समजून घेण्याचा…
दाखविले कुठे प्रेम
माया न ममता….
अन दाविले कुठे
नात्याचा बाजार खोटा…
पैसा, बंगला गाडी
याचा विचार न बरा….
जो जवळी आपल्या
तोच माणुस खरा…
राजा रंक एकसमान
नाही कोणी मोठे…
आहे सर्व खुजे अन लहान…
म्हणून सांगतो आपणास
वेळ आहे हो हातात..
विचार करीता जरा
जपा गोडवा नात्यात…
नका बनु त्याची कळसूत्री
पालन करा राजाहो
सरकारने बनवलेली त्रिसूत्री…
मी मी म्हणणारे
असेच संपवले त्याने….
खरच वेळेचे आयुष्याचे
महत्वही दाखवले त्याने…
करीता पालन सूचनांचे
होणार नाही जाणीव
आपल्या वेदनांचे…
रुसवा अबोला सोडुन द्या
आपल्याच नात्यातला…
काळ ओळखून राहा
आहे तो आपल्यातला…
करूया प्रार्थना मना मनातून
कायमचा जावो कोरोना
साऱ्या जगातून
साऱ्या जगातून…

प्रसाद प्रभाकर हांडोरे
सिन्नर, जि नाशिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *