Poem By Prasad Handore : मुलासाठी वडिलांनी केलेली कविता ‘लेकरू’

 

Poem By Prasad Handore : मुलासाठी वडिलांनी केलेली कविता ‘लेकरू’
Pckhabar- मला कोरोना झाला होता. मनातून मी हबकलो होतो ,परंतु माझ्या सोळा वर्षाच्या मुलाने त्या काळात माझी जी काळजी घेतली त्याबद्दल त्याच्यासाठी स्फुरलेलं हे काव्य माझ्यासारख्या अनेक बाबांसाठी आणि काळजी घेणाऱ्या अनेक लेकरांसाठी

लेकरू
बापाच्या आजारपणात
धावपळ करणार पोरगं
पाहुनी बाप हळवा झाला…
नकळत लहानाचं मोठ
कधी हा लेक झाला…
गुणगान गातो आपण लेकीच्या बाबत …
पण मुलगाही असतो जशी सावली असते सोबत …
पाहता-पाहता बाप बरा झाला…
किती मोठा झाला हा प्रश्न मनी सतावत होता..
बापाचा हात धरणार लेकरू,
आज बापाचा बाप झाला होता…
आजापणातही सुख काय असते
दावले आज लेकरा ने,
आनंद झाला आजारपणातून बरे झाल्याने….
जगण्याची नवी उमेद दिली
आज माझ्या लेकरा ने…
मिळू दे असाच लेक प्रत्येकाच्या नशिबी ….
अभिमानाने फिरा अश्या लेकराचा बाप बनोणी …

प्रसाद प्रभाकर हांडोरे
सिन्नर, जिल्हा नाशिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *