Pathrud News : तरूणांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला दिले ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ‘

Pathrud News : तरूणांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला दिले ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ‘

Pckhabar- आपल्या मायभूमीतील कोरोनाची गंभीर परिस्थिती पाहून ऑस्ट्रेलियामध्ये वास्तव्यास असलेल्या आणि राज्यातील विविध भागात नोकरीनिमित्त कार्यरत असलेल्या तरूणांनी पाथरूड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला 65 हजार रुपये किंमतीचा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट दिला.

देशासह राज्यातील ग्रामीण भागात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठ्या प्रभाव आहे. ग्रामीण भागात आरोग्याच्या प्रभावी सोई-सुविधा नाहीत. या कोरोना महामारीत आपल्या नागरिकांसाठी काही तरी करावे या उद्देशाने हरिदास साठे, रोहित तिकटे त्यांच्या वर्गमित्र सहकाऱ्यांनी 55 हजार रुपये तर नाना ढवारे आणि माणिकराव यादव सोशल फाऊंडेशन ( Mayself foundation) च्या वतीने प्रत्येकी 5000 रुपये असे 65 हजार रुपये जमा केले. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन व परिक्षित खामकर यांच्याकडून स्टॅबिलायझर खरेदी करून भूमच्या तहसीलदार उषा किरण शृंगारे यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र पाथरूड यांच्याकडे मशीन सुपूर्त करण्यात आले. यावेळी गावचे प्रतिष्ठित नागरिक व युवक उपस्थित होते.

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरमुळे पाथरूड आणि परिसरातील नागरिकांना तात्पुरत्या ऑक्सिजनची सोय या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिल्यामुळे नागरिकांनी तरूणांचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *