Kalamb News: राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कळंब तालुका उपाध्यक्षपदी चांगदेव कुटे

Kalamb News: राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कळंब तालुका उपाध्यक्षपदी चांगदेव कुटे
Pckhabar- राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कळंब तालुका उपाध्यक्षपदी सौंदणा (डी) येथील चांगदेव कुटे यांची निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देवून कुटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुटे यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.

निवडीनंतर चांगदेव कुटे म्हणाले” पक्षाने दाखविलेला विश्वास आपण सार्थ ठरवून दाखवू. कळंब तालुक्यात युवकांचे मजबूत संघटन तयार करण्यासाठी आपला प्रयत्न असणार आहे”.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *