आडोशी बोगद्याजवळ आँईलचा टँकर उलट्याने द्रुतगती मार्गावर वाहतुक कोंडी

आडोशी बोगद्याजवळ आँईलचा टँकर उलट्याने द्रुतगती मार्गावर वाहतुक कोंडी

Pckhabar- मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ मुंबईच्या दिशेने जाणारा एक आँईलचा टँकर उलटून सर्व आँईल रस्त्यावर पसरल्याने मुंबईच्या दिशेने जाणारा मार्ग सुमारे तीन तास बंद करण्यात आला होता. सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा आँईल टँकर खोपोली खालापुर दरम्यान आडोशी बोगदा या ठिकाणी पलटी झाला. टँकरमधून मोठ्या प्रमाणात आँईल रस्त्यावर पसरल्याने वाहने सरकून जाऊ लागली याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून द्रुतगती मार्गावरील मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक थांबविण्यात आली होती. खाजगी लहान वाहने ही वलवण लोणावळा येथून जुन्या महामार्गावर वळविण्यात आली होती तर मोठी अवजड वाहने थांबविण्यात आली होती.

दरम्यान लोणावळा शहरात अचानक वाहनांची गर्दी वाढल्याने गवळीवाडा नाका परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ऑइल मुळे रस्त्यावर झालेला निसरडेपणा दूर करण्यासाठी फायर ब्रिगेडच्या वाहनांतून रस्त्यावर पाणी मारत रस्ता धुण्यात आला तसेच आँईलवर माती टाकण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *