Maharashtra News : भूम-परंडा परिसरातील पूरग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात!
पुणे व परंड्यातील मित्रांचा माणुसकीचा ओलावा
Pckhabar- अतिवृष्टी आणि पुरामुळे परंडा, भूम तालुक्यातील शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागत आहे. शेती, घरे आणि सार्वजनिक मालमत्तेवर आलेल्या आपत्तीमुळे नागरिक उद्ध्वस्त झाले असून, या संकटाच्या काळात पुणे व परंड्यातील मित्रांनी मदतीचा ओलावा घेऊन हात पुढे केले आहेत.
भुम-परांडा तालुक्यातीलच पुणे येथे नोकरी व व्यवसाय करणारे निलेश पाटील, महेंद्र हुंबे, महेश कोलते तसेच परांडा येथील सुहास ठोंगे, अनिकेत लांडे यांनी गोळा केलेली मदत किट वाटप करून अनेक कुटुंबांना दिलासा दिला आहे. ‘माणुसकीच्या भावनेतून’ पुरग्रस्तांना शैक्षणिक किट, कपडे, किराणा किट, भांडे किट सुपूर्द करण्यात आले.
मदत साहित्य वाटपाचे तपशील –
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लोहारा येथे ४९ किट (जेवणाचा डब्बा, पाणी बॉटल, शैक्षणिक साहित्य), देवगाव खुर्द येथे कपड्यांचे किट, कांदलगावात २० किराणा किट व ६ भांड्यांचे किट, सिरसाव मध्ये ४२ किराणा किट, करंजा ५
किराणा किट, गहू, ज्वारी, बाजरी व एक भाड्यांचे किट, रुई आदिवासी समाज तील २० जणांना कपड्यांचे किट, साडेसांगवीत १५ भाड्यांचे किट, चिंचपूर ढगे १० किट भाड्यांचे किट, पाथरूड १२ किट भाड्यांचे किट, जामखेड तालुका आदिवासी समाज वस्तीत ८ भाड्यांचे किट, इतर गावांमध्येही किराणा व भाड्यांचे किट ही मदत ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमाअंतर्गत देण्यात आली. या मदत कार्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे तुकाराम ढोरे आणि टीम यांनीही मोलाचे सहकार्य केले आहे.










Leave a Reply