Dehu News : अभंग स्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न
pckhabar- श्रीक्षेत्र देहूतील सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये ७६ वा प्रजासत्ताक दिन व पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुण्या अप्पासाहेब पटवर्धन सफाई आणि पर्यावरण तंत्रनिकेतनच्या अध्यक्षा डॉ. शिल्पा मापुसकर यांच्या हस्ते ध्वजवंदन संपन्न झाले. या ध्वजवंदन सोहळ्यात देहू देवस्थानचे अध्यक्ष हभप पुरुषोत्तम महाराज मोरे, पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त हभप शिवाजी महाराज मोरे, विविध विकास कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन अभिमन्यू काळोखे, देहूचे माजी सरपंच अशोकराव मोरे, माजी सरपंच कृष्णा परंडवाल, विविध विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन गुलाबराव काळोखे, गुरुवर्य दत्तात्रय अत्रे, योग विद्या धामचे प्रमुख दत्तात्रय भसे, पिंपरी-चिंचवड शिक्षण मंडळाचे माजी सभापती धनंजय भालेकर, संस्थेचे मार्गदर्शक भागुजी काळोखे, सृजन फाउंडेशनचे अध्यक्ष सुनिल कंद, उपाध्यक्ष अशोक कंद, सचिव प्रा. विकास कंद शाळेच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर, उपप्राचार्या शैलजा स्वामी, पूर्व प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका सुबलक्ष्मी पाठक, शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

इ. तिसरी ते सहावीतील निवडक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची प्रात्यक्षिके सादर करुन उपस्थितांची वाहवा मिळवली. यामध्ये लाठी काठी, मल्लखांब, स्केटिंग, कराटे तसेच सेल्फ डिफेन्सच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी चित्तथरारक मानवी मनोरे रचून उपस्थितांची दाद मिळवली.

वर्षभर शाळेमध्ये ‘नदी… एक जीवनवाहिनी’ या संकल्पनेवर आधारित विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करताना सत्य, प्रेम, अहिंसा, विनयशीलता, नम्रता, आदरभाव या मूल्यांचा अंगिकार केला पाहिजे. शाळेचे तसेच आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करुन देशाचे चरित्रात्मक वैभव वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे मत कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ. शिल्पा मापुसकर यांनी व्यक्त केले व विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर यांनी केले. सृजन फाऊंडेशनचे सचिव प्रा. विकास कंद यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका शिवानी राबिया तर आभारप्रदर्शन सुजन पावटे यांनी केले.











Leave a Reply