Maharashtra News : प्रा. अशोक गायकवाड यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार
Pckhabar- वडगाव मावळ येथील श्री संत तुकाराम शिक्षण प्रसार मंडळाच्या कला वाणिज्य बीबीए महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक गायकवाड यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अविष्कार सोशल फाउंडेशन कोल्हापूर यांच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा राज्यस्तरीय क्रांतीबा ज्योतिबा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राध्यापक अशोक गायकवाड यांना देण्यात आला. गेले 17 वर्षे ते वडगाव मावळ येथील महाविद्यालयात अध्यापनाचे काम करत आहेत.
विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांचा लौकिक आहे. आपल्या महाविद्यालयात विविध उपक्रम त्यांनी राबवले आहेत. प्राध्यापक गायकवाड यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अशोक बाफना, अध्यक्ष श्री तुकाराम आसवले यांनी आनंद व्यक्त केला.












Leave a Reply