महिपतराव मोहिते साहेब हे एक निस्वार्थी समाजसेवक..!
कै. महिपतराव मोहिते यांच्या पुण्यतिथीनिमित्त – श्री.अरुण वसंतराव रावळ यांचा विशेष लेख
Pckhabar- दि सांगली जिल्हा कामगार को. आँपरेटिव्ह बँक लि. मुंबई स्थापना १९६४ गिरगाव पानबाजर येथे सांगली जिल्ह्यातील काही लोकांनी बँक स्थापना करण्याचे ठरवले त्या कार्यासाठी महिपतराव मोहिते यांचा मोलाचा वाटा होता. मोहिते साहेब तरुणपणीच मुंबईत आले. सुरवातीला आले होते ते मुंबईतील काळाचौकी विभागात कपडे शिवण्याचे काम करीत होते. म्हणून त्यांन “टेलर” या नावाने बरेचसे लोक ओळखत होते.
पश्चिम महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकं कापड गिरणीत काम करीत होते. त्यावेळी त्यांचा कम्युनिस्ट प्रणित “गिरणी कामगार युनियन” संबंध आला. मोहिते हे शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते. मोहिते साहेब दररोज सकाळी व दुपारी गिरण गावातील प्रत्येक गिरण्याच्या गेटवर कामगार हितासाठी सभा घेत होते. कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सतत लढत असल्यामुळे त्यांचा संबंध स्व. काँ.श्रीपाद डांगे, स्व.जाॅर्ज फर्नांडिस, स्व. पाटकर, गणाचार्य इत्यादी नेत्यांशी चांगला संबंध आले.
१९६४ साली “सांगली कामगार सहकारी बँकेची” स्थापना करण्यात आली. तेव्हा वसंतदादा पाटील, शालिनी ताई यांच्याशी संपर्क आला. त्यावेळी चव्हाण, मोहिते, व्हटकर, शिंदे, या सर्वांनी संपूर्ण मुंबई मधील आपल्या जिल्ह्यातील लोकांना एकत्रित करून सभासद करण्यासाठी खुप कष्ट घेतले. ते दिवस-रात्र फिरत होते. तेव्हा कुठे आपली बँक मुंबई शहरात स्व:मालकीच्या जागेत पाच शाखा उभ्या केल्या. तेव्हा त्यांनी बँक कर्मचारी आणि सभासद, खातेदार यांच्या हिताचे निर्णय घेतले होते. ते प्रत्येक कर्मचाऱ्याला प्रेमाने वागणूक दिली. त्यांनी कुणाला वाईट वागणूक दिली नाही.
१९७२ मध्ये महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता. आपल्या विटा-खानापूर भागातील लोकांना आर्थिक मदत व्हावी म्हणून त्यांनी “रयत सहकारी पतपेढी ” स्थापना केली. नंतर १९७७ मध्ये “क्रांती विणकर, उत्पादक लि.”ची स्थापना करून विटा, वडगांव, कमलापूर व हिंगणगाव येथे युनिट सुरू केले.
वडगांव येथील हायस्कूलची इमारत बांधण्यासाठी त्यांनी मुंबईत ” विद्यार्थी विकास मंडळ” स्थापन केले व त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक निधी जमा केला. हायस्कूलची नवीन इमारत बांधण्यासाठी फार मोठी मदत केली.
सागरेश्वर अभयारण्य निर्मिती साठी ते स्व. धो. मो. मोहिते यांच्या बरोबर अनेक वेळा मंत्रालयात जात होते. आज सागरेश्वर अभयारण्याच्या प्रवेशद्वारा समोर “यशवंतराव चव्हाण” यांचा जो पुतळा बसविला आहे तो बसविण्याचे संपूर्ण श्रेय स्व. महिपरात मोहिते यांचे आहे. ते रयत शिक्षण संस्थेच्या “जनरल बॉडी ” चे सदस्य होते. त्यांचा आणि स्व. एन. डी.पाटील त्यांचे खूप जवळचे मित्र होते. त्यांचे चांगले संबंधही होते. मंत्री असताना ते नेहमी मुंबईत आले की मोहिते साहेब आणि एन. डी. पाटील यांची भेट घेतल्या शिवाय राहत नव्हते.
समाजासाठी ,दिंनदूबळ्यांसाठी त्यांनी कोणताही स्वार्थ न ठेवता त्यांनी खूप कामे केली. त्यांनी विटा- खानापूर मधील दहावी-बारावी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांला मुंबईत आणून सांगली सहकारी बँकेत क्लार्क म्हणून बऱ्याच लोकांना नोकरीला लावण्याचे महान कार्य केले.
मी १९८८ मध्ये या बँकेत जेव्हा सर्व्हिसला लागलो तेव्हा. साहेबांचा आणि माझा परिचय गोवंडी शाखेत झाला. मला त्यांनी मॅनेजर मोझर साहेब यांच्या केबिनमध्ये मला बोलवून घेतले आणि माझी ओळख करून घेतली. तेव्हा ते मला म्हणाले “स्वातंत्र्य सैनिक गुंड्याभाऊ रावळ हे तुझे कोण आहेत ? तर मी म्हणालो माझे आजोबा आहेत अरे तू तर आमच्या मित्रांचा नातू आहेस मग माझापण नातू आहेस.” बँकेची कामे व्यवस्थितपणे करावी असा मला त्यांनी सल्ला दिला. आणि मला लगेच पुढील महिण्यात परमनंटची आँर्डर दिली. ही खरच माझ्यासाठी भाग्याची गोष्ट ठरली. मोहिते साहेबांना मी आणि माझे मोठे बंधू प्रकाश दादरला ते चेअरमन झाल्यावर अभिनंदन करण्यासाठी गेलो होतो तेव्हा त्यांनी आशीर्वाद दिला. स्व. मोहिते हे बँकेचे माँनेंजिंग डायरेक्टर (व्यवस्थापकीय संचालक) व चेरमान होते. परंतु आज जसे लोक बँकेचा लाभ घेतात तसा मोहिते साहेबांनी कोणत्याही प्रकारचा कधीही लाभ घेतला नाही.
पुढे क्रांती विणकरच्या उभारणीसाठी ते गावीच राहू लागले. तेव्हा स्व.पतंगराव कदम यांचे ही त्यांच्याशी चांगले संबंध आले होते. महिपतराव मोहिते त्यांच्या कार्याला त्यांच्या सुविध पत्नी स्व. वैजयंती यांची फार मोठी मोलाची, महत्त्वाची साथ लाभली होती. त्यांचा शेवट आजारपणात गेला व “मोहिते वडगाव” या त्यांच्या जन्मभूमीतच त्यांचे २४ जुलै २०१८ मध्ये त्यांचे निधन झाले. समाज एका गुणवंत समाजसेवकाला कायमचा मुकला. अशा या महापुरुषाला विनम्र अभिवादन.
– श्री.अरुण वसंतराव रावळ, मुंबई.










Leave a Reply