Dehu News : माघ शुद्ध दशमीच्या निमित्ताने श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर मोठ्या उत्साहात अखंड गाथा पारायण सोहळा सुरु

Dehu News : माघ शुद्ध दशमीच्या निमित्ताने श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर मोठ्या उत्साहात अखंड गाथा पारायण सोहळा सुरु
Pckhabar- श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर माघ शुद्ध दशमी व जगदगुरू श्री संत तुकाराम महाराजांचा जन्मदिवस वसंतपंचमीच्या निमित्ताने गेली ७१ वर्षांपासून सुरु असणा-या *‘अखंड हरीनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्यास’* मोठ्या भक्तीभावाने व उत्साहाच्या वातावरणात आज बुधवार, दि. १४ फेब्रुवारी २०२४ पासून सुरुवात झाली.

आज पहाटे ५ वाजता परंपरेप्रमाणे मावळचे माजी आमदार स्वर्गीय दिगंबरदादा भेगडे याचे चिरंजीव श्री मनोहर भेगडे व परिवाराच्यावतीने श्री पांडुरंगाला अभिषेक व महापूजा संपन्न झाली. या प्रसंगी भोसरीचे माजी आमदार विलासराव लांडे पाटील, वाकुळणी येथील संतपीठाचे प्रमुख, गाथामूर्ती हभप नानामहाराज तावरे, उद्योजक श्री विजयशेठ जगताप, संत साहित्याचे अभ्यासक, कीर्तनकार हभप पंकजमहाराज गावडे, माजी सभापती विठ्ठलराव शिंदे, कासारवाडी येथील दत्त आश्रमाचे मठाधिपती शिवानंद स्वामी महाराज, पि.चिं. शहराचे माजी नगरसेवक आप्पा बागल, श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष हभप बाळासाहेब काशीद व सर्व विश्वस्त, भंडारा डोंगर परिसरातील इंदोरी, सुदवडी, जांबवडे, सुदम्ब्रे आदी गावांचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या गाथा पारायण सोहळ्यासाठी मराठवाडा, विदर्भासह महाराष्ट्राच्या विविध भागातून तसेच मध्यप्रदेश, कर्नाटक आदी राज्यातून आलेल्या सर्व भाविकांचे स्वागत श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष हभप बाळासाहेब काशीद यांनी केले. या निमित्ताने आपल्या प्रास्ताविकातून भंडारा डोंगरावरील हे भव्य-दिव्य मंदिर निर्माणाचे पवित्र कार्य लवकरात लवकर पूर्णत्वास जावे याकरिता वारकरी संप्रदायातील सर्व थोर कीर्तनकार, प्रवचनकार, महाराज मंडळी तसेच तुकोबारायांवर नितांत श्रद्धा असणारे समाजजीवनात कार्यरत असणारे सर्व लहानथोर या मंदिर निर्माणाच्या कार्याला मदत करीत असून मंदिराचे काम मोठ्या प्रमाणात आकार घेऊ लागले असून आजपर्यंत मंदिराचे निम्मे काम पूर्ण झाले आहे. व सर्वांच्या सहकार्याने संत तुकाराम महाराजच हे पवित्र मंदिर निर्माणाचे कार्य पूर्णत्वास नेतील अशी मनोकामना बाळासाहेब काशीद यांनी व्यक्त केली. या प्रसंगी माजी आमदार विलासराव लांडे पाटील व संत साहित्याचे अभ्यासक, कीर्तनकार हभप पंकजमहाराज गावडे यांनी या सोहळ्यास शुभेच्छा दिल्या व तसेच गाथा पारायण सोहळ्याचे व्यासपीठ नेतृत्व करणारे हभप नानामहाराज तावरे यांनी आशीर्वाद दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *