Bhosari News : वेस्ट टू एनर्जी’, ‘प्रधानमंत्री आवास’चे मंगळवारी लोकार्पण
– भाजपा आमदार महेश लांडगे यांची माहिती
– ‘भोसरी व्हीजन-२०२०’मधील वचनपूर्तीचे समाधान
pckhabar-‘भोसरी व्हीजन- २०२०’ अंतर्गत हाती घेतलेला राज्यातील पहिला ‘वेस्ट टू एनर्जी’ म्हणजेच कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प कार्यान्वयीत झाला आहे. तसेच, सर्वांसाठी घर या संकल्पनेतून प्रधानमंत्री आवास योजनेतून पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल १७ हजार ७५ घरांची निर्मिती होत आहे. ही बाब निश्चितच समाधानाची असून, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण व भूमिपूजन होणार आहे, अशी माहिती भाजपा आमदार महेश लांडगे यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मोशी येथे उभारण्यात आलेल्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाचे उद्घाटन आणि डूडूळगाव व सेक्टर- १२ येथील प्रधानमंत्री आवास योजना प्रकल्पाचे भूमिपूजन तसेच, बोऱ्हाडेवाडी येथील प्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. १ ऑगस्ट रोजी शिवाजीनगर येथील पोलीस परेड मैदानावर दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास राज्याचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, खासदार प्रकाश जावडेकर, वंदना चव्हाण, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार, अश्विनी जगताप, आमदार अण्णा बनसोडे, आमदार उमा खापरे यांच्यासह पुण्यातील लोकप्रतिनिधी, संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.










Leave a Reply