Dehu News : योग करुन निरोगी रहा, हा आरोग्याचा मूलमंत्र देत अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये जागतिक योग दिवस साजरा
Pckhabar – सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल, देहू मध्ये जागतिक योग दिवस आरोग्याचा मूलमंत्र देत साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांकडून ॐकार व प्राणायाम करुन जागतिक योग दिवसाचा श्रीगणेशा करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांकडून सर्वांग सुंदर व्यायाम म्हणजेच सूर्यनमस्कार करुन घेतले.
त्याच बरोबर सूर्यनमस्कारातील आसनाचे नाव व सूर्याची बारा नावे सांगितली. मुलांना करण्यासाठी सोपे असणारे वृक्षासन, मुद्रासन, वीरासन, धनुरासन आदि आसनेही मूलांकडून करुन घेण्यात आली. इयत्ता पाचवी जगदीशचंद्र बोस या वर्गातील अथर्व हिंगे व विश्वेन थोरात यांनी योग दिनाचे महत्व सांगत आपली मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. टी. शिक्षक अश्रफ शेख यांनी केले.








Leave a Reply