Dehu News : समर स्पर्धेत कृष्णपिंगाक्ष प्रोऍक्टिव्ह अबॅकसचे तीन विद्यार्थ्यांनी विजयी

Dehu News : समर स्पर्धेत कृष्णपिंगाक्ष प्रोऍक्टिव्ह अबॅकसचे तीन विद्यार्थ्यांनी विजयी
Pckhabar – प्रोऍक्टिव्ह अबॅकसच्या माध्यमातून पुणे येथे झालेल्या समर स्पर्धेत श्री क्षेत्र देहूगाव येथील कृष्णपिंगाक्ष प्रोऍक्टिव्ह अबॅकसच्या माध्यमातून तीन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सहभागी झालेल्या तिघांनीही विजेतेपदाची ट्रॉफी मिळवली.

स्पर्धेत सहभागी झालेले स्वरा संतोष प्रक्षाळे, सोहम संदिप भापकर, स्वरूप महेश होनराव या तिघांनीही स्वतःच्या करिअरमध्ये विजेतेपदाचा मानाचा तुरा लावला त्याबद्दल कृष्णपिंगाक्ष प्रोॲक्टिव्ह अबॅकसच्या वतीने विजयी झालेल्या तिन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

या स्पर्धेत पुणे व सोलापूर येथून सर्व सहभागी असलेल्या एकूण एक हजार स्पर्धकांमधून कृष्णपिंगाक्ष प्रोऍक्टिव्ह अबॅकसचे तीनही विद्यार्थ्यांनी विजयी ठरले. त्याबद्दल कृष्णपिंगाक्ष प्रोॲक्टिव्ह अबॅकसला सर्वोत्कृष्ट अकॅडमी ( BEST CENTER ) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान आपल्या भारतातील प्रोॲक्टिव्ह अबॅकस या नामांकित कंपनीचे डायरेक्टर श्री गिरीश करडे सर यांच्या हस्ते कृष्णपिंगाक्ष प्रोॲक्टिव्ह अबॅकसचे संचालक श्री परमेश्वर आंधळे यांनी स्विकारला.

यासाठी सहकार्य केलेल्या सर्व पालकांचे, विद्यार्थ्यांचे धन्यवाद. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांमुळे आज आपण हे यश संपादन करू शकलो. त्याबद्दल कृष्णपिंगाक्ष प्रोॲक्टिव्ह अबॅकसच्या वतीने गिरीश करडे यांनी सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *