Pimpri News: राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा ब्रीजभूषण सिंह यांच्या विरोधात कँडल मोर्चा

Pimpri News: राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा ब्रीजभूषण सिंह यांच्या विरोधात कँडल मोर्चा

Pckhabar – महिला कुस्तीपटूवर झालेल्या अन्याया विरोधात न्याय मिळावा आणि कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार ब्रीजभूषण सिंह यांच्यावर तातडीने कारवाई होण्यासाठी शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीने निगडी चौक तहसील कार्यालय बाहेर कँडल मोर्चा काढण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला अध्यक्ष प्रा. कविता आल्हाट, युवक अध्यक्ष इम्रान शेख, कार्याध्यक्ष कविता खराडे,भोसरी विधानसभा अध्यक्ष ज्योती तापकीर, युवक स्वयंरोजगार प्रदेशाध्यक्ष मेघा पवार, अर्बन सेल अध्यक्ष मनीषा गटकळ, उपाध्यक्ष पूनम वाघ सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष गंगा धेंडे सेल अध्यक्ष निर्मला माने, वंदना जाधव ,मेघा पळशीकर जया गवळी, विजया काटे,विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

समाजात वेगळा संदेश जातोय- प्रा. आल्हाट

गेल्या तीन महिन्यांपासून महिला कुस्तीपटू न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र केवळ वेळकाढूपणाचे धोरण राबवले जात आहे.अद्यापही आरोप झालेल्या ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे सर्वसामान्य महिलांच्या प्रश्नांना किती न्याय मिळेल असा प्रश्न उपस्थित होत आहे. महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कारवाई न झाल्यास समाजात यामुळे वेगळा संदेश जाण्याचा जाण्याची भीती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *