Dehu News : पालखी सोहळ्यानिमित्त 1800 वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, औषधांचे वाटप

Dehu News : पालखी सोहळ्यानिमित्त 1800 वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, औषधांचे वाटप

Pckhabar – जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त देहूगाव येथील आई हॉस्पिटल आणि आई मेडिकल, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्र, देहू, व्हिऍक इंडिया प्रा. लि. आणि प्रभावी मूल्यवर्धक शिक्षण प्रसारक मंडळ विशाल इंगळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत औषधोपचार केंद्रात 1800 वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी आणि औषधांचे वाटप करण्यात आले.

देहू-आळंदी रोडवरील जैन मंदिरासमोरील आई हॉस्पिटल व आई मेडिकल समोर दि. 9 ते दि. 11 या कालावधीत मोफत औषधोपचार केंद्र व आरोग्य तपासणी करण्यात आली.

याबाबत माहिती देताना आई हॉस्पिटलचे डॉ. विशाल लोंढे म्हणाले की, तीन दिवस मोफत आरोग्य तपासणी शिबिरात वारकऱ्यांची बी पी, ऑक्‍सिजन लेवलची तपासणी करण्यात आली. 20 वारकऱ्यांच्या पायाला ठेच अथवा अन्य बाबींमुळे जखमा झाल्या होत्या. त्यांची मलमपट्टी केली. सर्दी, खोकला, ताप, थंडी, अंगदुखी यावरील वारकऱ्यांना मोफत औषधे दिली. तसेच एका वारकऱ्याला उष्माघाताचा त्रास झाला असता त्यावर तत्काळ उपचार केले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *