Dehu News : श्रीक्षेत्र देहू ते पंढरपूर आनंदवारीत आनंदडोह नाट्यप्रयोगाचे पालखी मार्गावर विविध ठिकाणी होणार सादरीकरण
‘आनंदडोह’ चे 15 प्रयोग होणार
अनोख्या उपक्रमाचे उद्घाटन सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये उद्या होणार
जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती
Pckhabar – श्रीक्षेत्र देहूहून पंढरपूरला जाणाऱ्या वारीसोबत यंदा जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकारामांचे जीवनचरित्र एकपात्री प्रयोगातून सादर करण्याचा अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज 338 व्या पालखी सोहळ्यानिमित्त संवाद, पुणे व सावित्रीबाई फुले विद्यापीठ – राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमांतर्गत श्रीक्षेत्र देहू ते श्रीक्षेत्र पंढरपूर वारीच्या मार्गावर जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनाचे दर्शन घडविणारा, अभिनेते योगेश सोमण यांच्या समर्थ अभिनयातून साकारणारा एकपात्री नाट्यप्रयोग *’आनंदडोह’* चे एकूण १५ प्रयोग होणार आहेत. या अनोख्या उपक्रमाचे उद्घाटन देहूतील सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल येथे शुक्रवार, दि.९ जून २०२३ रोजी सायं. ५.३० वाजता संपन्न होईल.
शुभारंभाच्या पहिल्या प्रयोगाचे उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत साहित्याचे गाढे अभ्यासक व घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे हे असतील. तसेच मावळ लोकसभेचे खासदार मा. श्रीरंगआप्पा बारणे, मावळचे आमदार मा. सुनीलअण्णा शेळके, माजी राज्यमंत्री मा. संजय भेगडे, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू, श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष श्री बाळासाहेब काशीद, संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष हभप पुरुषोत्तममहाराज मोरे, देहूच्या नगराध्यक्षा सौ. स्मिता चव्हाण, पालखी सोहळा प्रमुख हभप संजयमहाराज मोरे, हभप भानुदासमहाराज मोरे, हभप अजयमहाराज मोरे तसेच संत साहित्याचे अभ्यासक हभप पंकजमहाराज गावडे व हभप सचिनमहाराज पवार इ. मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती प्रमुख संयोजक संवाद, पुणेचे अध्यक्ष श्री. सुनील महाजन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रसेवा योजनेचे सल्लागार श्री. राजेश पांडे व या पहिल्या प्रयोगाचे निमंत्रक, सृजन फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. सुनील कंद, सचिव प्रा. विकास कंद आणि शाळेच्या प्राचार्या डॉ.कविता अय्यर यांनी दिली.










Leave a Reply