Bhoom News : सरिता हनुमंत महानवर हिची महाराष्ट्र पोलीस दलात निवड

Bhoom News : सरिता हनुमंत महानवर हिची महाराष्ट्र पोलीस दलात निवड
सावरगावातील पहिलीच मुलगी पोलीस दलात

Pckhabar- दुर्दम इच्छाशक्तीच्या जोरावर धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्‍यातील सावरगाव (पा) येथील शेतकरी कुटुंबातील सरिता हनुमंत महानवर हिची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाली आहे. तसेच सावरगाव येथील पहिलीच मुलगी पोलीस दलात भरती झाल्यामुळे सरितावर कौतूकाचा वर्षाव होत आहे.

सरिता हिला मैदानी चाचणीमध्ये 39 तर लेखी परीक्षेत 85 असे 124 गुण मिळाले आहेत.

निवड झाल्यानंतर भावना व्यक्त करताना सरिता महानवर म्हणाली की, ‘थ्री-एस ॲकडमीचे संस्थापक देवकर सर यांच्या मार्गदर्शनामुळे पोलीस दलात भरती झाले आहे. तसेच अंगावर खाकी वर्दी असावी, अशी मनात तीव्र इच्छा होती. त्यानुसार भरतीसाठी प्रचंड मेहनत घेतली. मेहनतीचे चांगळे फळ मिळाले आहे.  तसेच सावरगावातील मी पहिलीच मुलगी महाराष्ट्र पोलीस दलात भरती झाली असल्यामुळे मोठा आनंद होत आहे. माझ्याकडे बघून गावातील इतर मुली पोलीस दलात अथवा शासकीय नोकरी मिळविण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील, असा विश्वास सरिताने व्यक्त केला. तसेच माझ्या यशामध्ये देवकर सरांसह आई- वडिलांचाही मोलाचा वाटा असल्याची भावना तिने व्यक्त केली.’

दरम्यान, थ्री-एस ॲकडमीमधील पाच मुलींनी पोलीस भरतीत यश मिळविले आहे. त्यामुळे थ्री-एस ॲकडमीच्या देवकर सर यांचेही मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *