Pune News : राजमाता जिजाऊ आदर्श माता पुरस्काराने छाया विलास चौधरी यांचा गौरव
Pckhabar – अखिल भारतीय शिवजयंती महोत्सव २०२३ आयोजित जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यात सौ छाया विलास चौधरी यांना राजमाता जिजाऊ आदर्श माता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुण्यातील लाल महालात जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात छायाताई विलास चौधरी यांचा व विलास चौधरी यांचा सन्मान करण्यात आला. याठिकाणी माजी पुणे मनपा आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, विकास आण्णा पासलकर, माजी आमदार दिपक मानकर, कैलास वडगुले, प्रशांत धुमाळ, विठ्ठल शिंदे, नेत्रतज्ज्ञ डॉ. स्वप्निल छायाविलास चौधरी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरस्काराला उत्तर देताना छाया विलास चौधरी म्हणाल्या” राजमाता जिजाऊ माँसाहेब या जगातील आदर्श माता, तसेच स्वराज्यप्रेरिका होत्या. त्यांनी दिलेल्या प्रेरणेमुळे आणि मार्गदर्शनामुळे रयतेचे राज्य निर्माण करून छत्रपती शिवाजी महाराज यांची जगातील आदर्श राजे म्हणून ओळख निर्माण झाली. राजमाता यांच्या नावाने मला जो पुरस्कार मिळाला, याबद्दल मी स्वतः ला भाग्यवान समजते.”










Leave a Reply