Dehu News : विविध क्रीडा शर्यतीतून बालचमूंनी पालकांना दिला सकस व पोषक आहाराचा संदेश
श्रीक्षेत्र देहूतील सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये पूर्व प्राथमिक विभागाचा क्रीडा दिन उत्साहात

Pckhabar – अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागाच्या शिक्षिकांनी नर्सरी ते सिनियर केजीच्या बालचमूंसाठी पोषक आहार या संकल्पनेवर आधारित नाविन्यपूर्ण अशा विविध क्रीडा शर्यतींचे आयोजन करीत या क्रीडा शर्यतींच्याच माध्यमातून मुलांना बाहेरचे आरोग्यास घातक असणारे पदार्थ न देता घरी बनवलेले सकस व ताजे अन्न द्यावे हा संदेश उपस्थित पालकांना देण्यात आला.
लहानपणापासूनच मुलांमध्ये सकस पोषक व संतुलित आहार घेण्याची सवय निर्माण व्हावी म्हणूनच सर्व शिक्षिकांनी नवनवीन शर्यतींचे प्रकार शोधून काढले होते. स्पर्धा जिंकणे अथवा हरणे या सर्व गोष्टींशी लहान मुले अनभिज्ञ असतात. या क्रीडा दिनाचा उद्देश फक्त पालकांचे व मुलांचे मनोरंजन करणे हा होता आणि हाच उद्देश सार्थ करत सर्व चिमुकले विजेते ठरले.
श्रीक्षेत्र देहूतील सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये पूर्व प्राथमिक विभागाचा क्रीडा दिन अगदी उत्साहात व जल्लोषात पार पडला. पालकांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहत या क्रीडा शर्यतींना छान प्रतिसाद दिला. शाळेच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. नर्सरी ते युकेजी मधील सर्व चिमुकल्यांनी उत्तम संचलन (मार्चपास्ट) केले. वर्ग व तुकडीनिहाय लहान मुलांनी रिबिन, लेस, पॉम पॉम च्या मदतीने बहारदार प्रदर्शन कले. आपल्या चिमुकल्यांना पाहण्यासाठी, त्यांचे कौतुक करण्यासाठी पालक वर्ग ही बहुसंख्येने उपस्थित होता. लहान लहान मुलांनी केलेल्या शाळेच्या नावाच्या फॉरमेशन(AEMS 2022) ने उपस्थित सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
सहशिक्षिका सौ. योगिता नांगरे व सौ. आम्रपाली खिलारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सौ. सुबलक्ष्मी पाठक यांनी आभारप्रदर्शन केले.










Leave a Reply