Pune News : ६१ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा पुणे केंद्रातून ‘संगीत दहन आख्यान’ प्रथम

Pune News : ६१ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा पुणे केंद्रातून ‘संगीत दहन आख्यान’ प्रथम

अभिनयासाठी गुणवंत प्रमाणपत्रांने कोमल पवार यांचा गौरव

Pckhabar –  ६१ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत पुणे केंद्रातून व्यक्ती, पुणे या संस्थेच्या संगीत दहन आख्यान या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच नाट्य संस्कार कला अकादमी, पुणे या संस्थेच्या ‘वार्ता वार्ता वाढे’ या नाटकाला द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे पुणे केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे- आकांक्षा बालरंगभूमी, पुणे या संस्थेच्या तुटक या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. दिग्दर्शन प्रथम पारितोषिक सुयश झुंजुरके (नाटक संगीत दहन आख्यान), द्वितीय पारितोषिक सागर लोधी (नाटक-तुटक), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक निखील मारणे (नाटक- संगीत दहन आख्यान), द्वितीय पारितोषिक राहुल जोगळेकर (नाटक- आबालाल आडकीत्ते आणि मुमताज महल), नेपथ्य : प्रथम पारितोषिक जयंत टोले (नाटक-बिंदु सरोवर), द्वितीय पारितोषिक नितीन पगारे (नाटक- दिव्या), रंगभूषा : प्रथम पारितोषिक अरविंद सूर्य (नाटक-बिंदु सरोवर), द्वितीय पारितोषिक तृप्ती टिबे (नाटक- संगीत दहन आख्यान) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक प्रवीण काळोखे (नाटक-तुटक) व अद्वैता कुळकर्णी (नाटक- संगीत दहन आख्यान), अभिनवासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे उज्वला गौड (नाटक- ठीय्या), हेमांगी काळे- गरुड (नाटक-चंद्राची दुसरी बाजू), चंद्रमणी खलाने नाटक मावला चिकणे (नाटक- आबालाल आडकीत्ते आणि मुमताज महल, कोमल पवार (नाटक आणि हे शहर सुध्दा), हीमांशु पिल्ले (नाटक वार्ता वार्ता पुढे), ज्ञानेश्वर भिल्लारे (नाटकचारपडच्या बलाला था), प्रतीक ग (नाटक-आबालाल आडकीत्ते आणि मुमताज महल), महेंद्र मारणे (नाटक संगीत दहन आख्यान) मंथन महाडीक (नाटक-बिंदु सरोवर).

दि. १५ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर, २०२२ या कालावधीत भरत नाट्य संधोधन मंदिर, पुणे येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत २१ एकूण नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सर्वश्री अरुण भडसावळे, सुहास देशपांडे आणि मदन दंडगे यांनी काम पाहिले. सर्व पारितोषिक विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे.

द सिंधु थिएटर अँड फिल्म इन्स्टिट्युट ,
हडपसर , पुणे निर्मित
आणि सह्याद्री प्रतिष्ठान प्रस्तुत ..
दोन अंकी मराठी नाटक “आणि हे शहर सुद्धा …”
लेखक : रविंद्र वाडकर ..
दिग्दर्शक : बालाजी माने ..

अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र

पात्र : संध्या
कलाकार : कोमल संजय पवार

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *