Mumbai News : मोरणा वारणा सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा संपन्न

Mumbai News : मोरणा वारणा सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा संपन्न

Pckhabar- ” मोरणा वारणा सहकारी पतसंस्था” या संस्थेची ४० वी सर्वसाधारण वार्षिक सभा नुकतीच नवी मुंबईतील कोपरखैराणे येथील अण्णाभासाहेब पाटील स्मृतिभावन येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

संस्थेच्या मुंबई, वाशी,ठाणे,
घणसोली, कामोठे व शिराळा येथे शाखा असून संस्थेचे संस्थापक व विद्यमान अध्यक्ष ऍड. संपतराव पवार, उपाध्यक्ष श्री.शिवाजी जाधव, सेक्रेटरी श्री.शामराव जाधव यांच्या कुशल नेतृत्वाखाली चांगली प्रगती केली आहे.
संस्थेचे साडे तेरा हजारापेक्षा अधिक सभासद असून साडे तीन कोटी पेक्षा अधिक भागभांडवल आहे तर संस्थेकडे ६८ कोटी पेक्षा अधिक ठेवी आहेत.

संस्थेने सातत्याने १५ टक्के दिला होता. कोरोना च्या साथीने सर्वच संस्थांना फटका बसला तसा याही संस्थेला बसला तरी संस्थेने या वर्षी नऊ टक्के लाभांश सभासदांना दिला आहे.

संस्था लवकरच नवी मुंबईतील उलवे, पालघर जिल्ह्यातील विरार, सांगली येथील इस्लामपूर मध्ये शाखा काढणार आहे.

मागील सभेचे इतिवृत्त संचालक श्री. रवींद्र पोतदार यांनी वाचून दाखविले, संचालक श्री.संजय घेवदे यांनी लेखापरिक्षकांचा अहवाल वाचून दाखविला. अध्यक्ष श्री.ऍड .पवार शंका निरसन केले.

संचालक श्री.सुरेश करुंगलेकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन संचालक श्री.पोतदार यांनी केले

सभेत श्री.शिंदे, लतीफ शेख,प्रा. कांबळे डॉ. अंकुश जाधव इ.नी संस्थेविषयी आपले मनोगत व्यक्त केले. राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *