Dehu News : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त वात्सल्य दिव्यांग अनाथ आश्रमाला मदतीचा हात
देहूगावातील मराठवाडा मित्र मंडळाच्या वतीने 74 वा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा
Pckhabar- देहूगावातील मराठवाडा मित्र मंडळाच्या वतीने 74 वा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या उत्साहात आणि सामाजिक बांधिलकी जोपासत साजरा करण्यात आला. यानिमित्त वात्सल्य दिव्यांग अनाथ आश्रम येथे श्री स्वामी रामानंद तीर्थ यांचे पूजन केले. अनाथ आश्रमाला धान्य व जीवनावश्यक वस्तू भेट दिल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. तिरूपती पांढरे हे होते. तर, पोलीस हेड कॉन्स्टेबल कविता धोंडगे, हेमा गवारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हानमंत ढगे, किरण पवार, राजीव चिद्रे, दौलत वाकुरे, नितीन बनसोडे, विठ्ठल अटक, संदीप गिरी,गोविंद मजगे, प्रकाश राऊत, विजयमुर्ती बिराजदार,कैलास वाघमारे,दत्ता धोंडगे, शिवाजी लाखाळ,महादेव आडमाने, देविदास रोडे, निखिल घारोळकर, योगेश शेलार, सोमनाथ काळे, शिवराज मोरे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलासराव बोराटे यांनी केले.











Leave a Reply