Chinchwad News : अय्याचार व शिवदीक्षाविधी होणार २१ ऑगस्टला 

Chinchwad News : अय्याचार व शिवदीक्षाविधी होणार २१ ऑगस्टला

Pckhabar-काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचे तपोनुष्ठान पिंपरी चिंचवड येथील चिंचवडे लॉन्स याठिकाणी सुरू आहे.  रविवार दिनांक २१ ऑगस्ट रोजी चिंचवडे लॉन्स येथे अय्याचार आणि दीक्षा विधी कार्यक्रम संपन्न होणार आहे.

दरवर्षीच्या श्रावण महिन्यातील त्यांचे बत्तीसावे तपोनुष्ठान आहे. यावर्षी या निमित्ताने अनेक धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम घेण्यात येत आहेत. आजपर्यंत हजारो भक्तांनी याचा लाभ घेतला आहे. परमपूज्य काशी जगद्गुरूंच्या दिव्य सान्निध्यात पंचपीठाचे अनेक शिवाचार्य सद्भक्तांना दीक्षा देणार आहेत. या विधीचा सदभक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन तपोनुष्ठान समितीचे महेश स्वामी आणि सहकारी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *