Pckhabar- कन्या विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात संपन्न
शिक्षण हे उत्तम माणूस घडविणारे असावे : सामाजिक कार्यकर्ते हृषीकेश वाघेरे
Pckhabar- रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालय पिंपरी वाघेरे या शाळेत (बुधवार) रोजी “व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान, हृषीकेश वाघेरे यांनी सर्वांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देत, आजचे शिक्षण हे उत्तम माणूस घडविणारे असावे व शिक्षणातून स्वकर्तृत्ववान विद्यार्थी तयार व्हावे असे मनोगत व्यक्त करत गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील व रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी युवानेते व सामाजिक कार्यकर्ते हृषीकेश वाघेरे , महात्मा फुले महाविद्यालयाचे उपप्राचार्य मोरे सर, प्राध्यापक भंडारे सर, बाळासाहेब वाघेरे(सामाजिक कार्यकर्ते) संत सेवक बाळासाहेब वाघेरे, भावसार सर, पाटील सर तसेच कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शारदा शेटे व पर्यवेक्षिका उर्मिला पाटील यांचे हस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली.
कार्यक्रमाचे प्रास्तविक करताना मा. पर्यवेक्षिका उर्मिला पाटील यांनी भारतीय संस्कृतीत गुरू – शिष्य परंपरेचे महत्त्व विशद करत गुरू आपल्याला उत्तम जीवन जगण्यासाठी संस्कारांची शिदोरी भरभरून देतात असे मनोगत व्यक्त केले . यानंतर एस एस सी. परीक्षा मार्च 2022मध्ये उत्तम यश मिळविणाऱ्या 1) कु रामगुडे भाग्यश्री कल्याण 2) कु म्हस्के साक्षी काळूराम 3) कु राऊत श्रावणी लक्ष्मण या विद्यालयात प्रथम तीन आलेल्या विद्यार्थिनींचा विद्यालयाच्या वतीने अतिथींच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच गुरुपौर्णिमे निमित्त सर्व अतिथीजन , गुरुजन व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचाही सन्मान करण्यात आला. या नंतर विद्यार्थीनी मनोगतामध्ये कु भाग्यलक्ष्मी स्वामी, कु अभिज्ञा हरोले, कु समृद्धी कुदळे, कु तेजस्विनी नाणेकर यांनी जीवनात गुरूंचे असलेले महत्त्व , गुरूंनी केलेले संस्कार त्याचा जीवनात होणार उपयोग याविषयी माहिती दिली. विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री प्रवीण राशीनकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना गुरू शिष्य परंपरेचे महत्त्व कथांच्या माध्यमातून उलगडले.
तसेच यावेळी शुभम उद्योग समूह पिंपरी यांच्या कडून शाळेला देणगी स्वरूपात प्रिंटर भेट देण्यात आला. यानंतर पुढील अतिथी संतसेवक श्री बाळासाहेब वाघेरे यांनी इतिहासातील संतांचे अनेक दाखले देत भारतीय परंपरेत गुरूंचे असलेले अढळ स्थान याविषयी माहिती दिली. यानंतर महात्मा फुले महाविद्यालयाचे उप प्राचार्य श्री मोरे सर यांनी “आपण ज्यांच्याकडून जे जे काही शिकतो मग तो लहान असो वा मोठा ते सर्व गुरू” जगाचा इतिहासात इतर प्राचीन संस्कृती जरी नष्ट झाल्या असतील तरी भारतीय संस्कृती मात्र टिकून असून जगाला प्रेरणादायी ठरत आहे असे मनोगत व्यक्त केले. या नंतर पुढील अतिथी मा. श्री भावसार सर यांनी ” भारतीय संस्कृतीतील समृध्द वाङ्ममय कृतीमध्ये आणणे म्हणजे गुरुपूजन होय असे मनोगत व्यक्त केले. यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौ शारदा शेटे मॅडम यांनी अध्यक्षीय मनोगतामध्ये अज्ञानरुपी अंध:कार दूर करून प्रकाशा ची वाट दाखविणाऱ्या गुरूंचे महत्त्व व्यक्त करत
ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत असताना बदलत्या शिक्षण पद्धती नुसार विद्यार्थ्यांना स्वकौशल्याची जाणीव करून देत विद्यार्थ्यांतून सुजाण व सुसंकृत दातृत्व शील नागरिक घडविण्याचे कार्य करावे. असे अनमोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु अनुष्का गवळी कु प्रतिक्षा वाघमारे व विद्यालयाच्या उपशिक्षिका सौ अनघा रांगणेकर यांनी केले. व कु अनुष्का लांडगे हिने कार्यक्रमास उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त करून कार्यक्रम संपन्न झाला.










Leave a Reply