Big News : इतिहासात प्रथमच देशाचे पंतप्रधान येणार तीर्थक्षेत्र देहूत

Big News : इतिहासात प्रथमच देशाचे पंतप्रधान येणार तीर्थक्षेत्र देहूत

भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी ट्विट करुन दिली माहिती

पंतप्रधानांच्या हस्ते होणार जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण

Pckhabar- काही दिवसांपूर्वीच देहू संस्थानाच्या विश्वस्तांना घेऊन आचार्य तुषार भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पणासाठी आमंत्रण दिले होते. हे आमंत्रण पंतप्रधानांनी स्विकारले असून १४ जूनला पंतप्रधान देहूत येणार आहेत.

देशाच्या इतिहासात प्रथमच पंतप्रधान तीर्थ क्षेत्र देहूत येणार आहेत. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

आचार्य तुषार भोसले यांचे ट्विट :

महाराष्ट्र आणि वारकरी संप्रदायासाठी ऐतिहासिक क्षण

इतिहासात पहिल्यांदाच भारताचे पंतप्रधान श्रीक्षेत्र देहु येथे येणार आहेत.

पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी दि. १४ जून रोजी करणार जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण !

॥ जय जय रामकृष्णहरि ॥

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *