Dehugaon News : देहूगावात साडेआठ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते भूमिपूजन

Dehugaon News : देहूगावात साडेआठ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते भूमिपूजन

देहू शहराच्या सर्वांगीण विकासासाठी  सदैव कटिबद्ध : आमदार सुनील शेळके

Pckhabar- श्री क्षेत्र देहू नगरपंचायत हद्दीतील सुमारे 8 कोटी 55 लक्ष रु.च्या विकासकामांचा भूमिपूजन समारंभ पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्या हस्ते  सोमवारी सायंकाळी संपन्न झाला.

यावेळी मावळचे आमदार सुनील शेळके म्हणाले”  सन २०२१-२२ महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान आणि नागरी दलितेत्तर वस्त्यांमध्ये सुधारणा करणे योजनेअंतर्गत महाविकासआघाडी सरकारच्या माध्यमातून देहुमधील या विकासकामांना सुमारे 8 कोटी 55 लक्ष रुपये निधी उपलब्ध झाला आहे. नगरपंचायत निवडणुकीत विकासकामांच्या जोरावर राष्ट्रवादीला साथ देण्याची विनंती देहूकरांना केली होती. त्यास प्रतिसाद देत देहूकरांनी भरभरून मतदानरुपी आशीर्वाद देऊन एकहाती सत्ता दिली.देहू शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. या विकासकामांचे फक्त भूमिपूजन न करता प्रत्यक्ष कामांना देखील सुरुवात होणार आहे. पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त कामे पुर्ण करण्यावर भर असणार आहे.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुकाध्यक्ष श्री.गणेश खांडगे, श्री क्षेत्र देहु नगरपंचायत मुख्याधिकारी श्री.प्रशांत जाधव, नगराध्यक्षा सौ.स्मिता चव्हाण, उपनगराध्यक्षा सौ.रसिका काळोखे, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष श्री.प्रकाश हगवणे, महिला शहराध्यक्षा सौ.रेश्मा मोरे, माजी सभापती सौ.हेमलता काळोखे, नगरसेविका सौ.मीना कुऱ्हाडे, सौ.पूजा दिवटे, सौ.शीतल हगवणे, सौ.प्रियांका मोरे, सौ.सपना मोरे, सौ.पुनम काळोखे, सौ.ज्योती टिळेकर, सौ.पौर्णिमा परदेशी, नगरसेवक श्री.योगेश परंडवाल, श्री.सुधीर काळोखे, श्री.योगेश काळोखे, श्री.प्रवीण काळोखे, श्री.मयूर शिवशरण, श्री.मयुर टिळेकर, श्री.आनंदा काळोखे, श्री.रोहित काळोखे, श्री.कांतीलाल काळोखे, श्री.बाळासाहेब काळोखे, श्री.प्रवीण झेंडे, सौ.वैशाली टिळेकर, आदि.मान्यवर, पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *