Poem : झुंजार शरद पवार साहेब
कवी- ॲड- विक्रांत विलास निर्धार

Pckhabar- पवार म्हणजे शेती आणि शिवार
पवार म्हणजे अनेक कुटुंबाचा आधार
पवार म्हणजे स्त्रियांना तेहतीस टक्के आरक्षण
पवार म्हणजे समतेचे राजकारण
पवार म्हणजे कार्य कर्त्यांची जंत्री
पवार म्हणजे बारामती टू देशाचे संरक्षण आणि कृषी मंत्री
पवार म्हणजे आय सी सी चे अध्यक्ष स्थान
पवार म्हणजे अन्न धान्य च रेकॉर्ड ब्रेक उत्पादन
पवार म्हणजे सुसंस्कृत मुत्सद्दीपणा
पवार म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचा कणा
पवार म्हणजे भल्या भल्यांना फुटतो घाम
पवार म्हणजे मोदींना पण आवडते ज्यांचे काम
पवार म्हणजे तेल लावलेला पैलवान
पवार म्हणजे ज्यांनी ई. डी. ची तलवार केली म्यान
पवार म्हणजे साताऱ्यातील पावसातली सभा
पवार म्हणजे विरोधकात पण दबदबा
पवार म्हणजे विकासाचे राजकारण
पवार म्हणजे दूर दृष्टीचे धोरण
पवार म्हणजे सह्याद्री चा अभेद्य असा कडा
पवार म्हणजे ज्यांनी कर्करोगास दिला यशस्वी लढा
पवार म्हणजे ज्यांनी दिली ग्रामीण तरुणाला नेतृत्वाची संधी
पवार म्हणजे महाराष्ट्रात डान्स बार वर बंदी
ठरलेलं समीकरण पवार म्हणजे पॉवर
पवार म्हणजे राजकारणातील उत्तुंग असा टॉवर
पवार म्हणजे अनेकांचे राजकीय गुरू
ऐंशीत ही जोमाने राजकीय प्रवास आहे सुरू
आई तुळजभवानी तुम्हाला दीर्घ आयुष्य प्रदान करो
पवार म्हणजे शतकवीर ठरो!
ॲड- विक्रांत विलास निर्धार.











Leave a Reply