Pimpri News: आगामी काळात ऑनलाईन सेवा देणारे व्यवसाय वाढीस लागतील : लेखक पीयूष संधाने

Pimpri News: आगामी काळात ऑनलाईन सेवा देणारे व्यवसाय वाढीस लागतील : लेखक पीयूष संधाने

Pckhabar- करोना येऊन गेल्यानंतर बरेच उद्योग, व्यवसाय यामध्ये बदल झाले. यातील बऱ्याच उद्योग, व्यवसायिकांनी ऑनलाईन सेवा देण्यास सुरुवात केली आहे. लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय बंद पडले. परंतु ज्यांनी ऑनलाइन सेवा देण्याचा मार्ग स्वीकारला त्यांचे उद्योग भरभराटीस आले आहेत. येणाऱ्या काळात ऑनलाईन व्यवसायात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असेल, असे प्रतिपादन लेखक पीयूष संधाने यांनी केले.

खराडी येथे ऑन पर्पज कम्युनिटी संस्थेच्या वतीने उद्योग, व्यवसायिकांनी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन ऑन पर्पज कम्युनिटी संस्थेचे आनंद मिश्रा यांनी केले होते.

पीयूष संधाने म्हणाले, आपण उत्पादन करत असलेल्या वस्तू किंवा सेवा या उत्तम असायला हव्यात. ग्राहकांना केंद्र बिंदू ठेवून त्यांना चांगल्या सेवा कश्या मिळतील यावर भर द्यायला हवे. तेव्हाच बाजारात आपला एक चांगला ब्रँड तयार होईल.

ऑन पर्पज कम्युनिटी संस्थेचे आनंद मिश्रा म्हणाले, नवीन युवकांनी उद्योग, व्यवसाय सुरू केल्यानंतर त्यांना अनेक अडचणी येतात. बाजारात स्पर्धा खूप मोठी आहे. त्यात टिकून राहण्यासाठी आम्ही उद्योग, व्यवसायिकांसाठी विविध शिबीराचे आयोजन करतो. यातून चांगले व्यवसायिक घडावेत यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *