Dehugaon News : देहू शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केतकीच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन

Dehugaon News : देहू शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केतकीच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन

Pckhabar- अभिनेत्री केतकी चितळे हिने नुकतीच तिच्या फेसबुक पेजवर लोकनेते शरद पवार यांचा अवमान करणारी आक्षेपार्ह कविता पोस्ट करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याने अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. देहू शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अशा समाज विघातक प्रवृत्तीचा निषेध करत केतकीच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करण्यात आले.

केवळ प्रसिद्धेच्या हौसेपायी आणि विकृत मनोवृत्तीने समाजस्वास्थ्य बिघडवणाऱ्या मनोवृत्तींचा निषेध करताना
पवार साहेबाचा अवमान म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे, अशी भावना या प्रसंगी व्यक्त करण्यात आली.

जेष्ठ नेते अभिमन्यू काळोखे,मा.ता.रा.कॉ. चे सरचिटणीस आण्णा काळोखे,नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, देहु शहर अध्यक्ष प्रकाश हगवणे, यु.अध्यक्ष योगेश मोरे, जि. रा.कॉ.चे उपाध्यक्ष सुरेश खुर्पे,शेखर परंडवाल,महिला अध्यक्षा रेश्मा मोरे, माणिक जाधव,ऍड.सुनील काळोखे यांनी या प्रसंगी मनोगतातून केतकी चा निषेध व्यक्त केला.
सदर प्रसंगी संत तुकाराम यांच्या अभंगाचा आणि नावाचा दुरुपयोग झाल्याने केतकीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी जयेश मोरे,विशाल परदेशीं यांनी व्यक्त केली.

या प्रसंगी नगरसेवक योगेश परंडवाल, योगेश काळोखे, सुधीर काळोखे काळोखे, मयुर् शिवशरण, पूजा दिवटे, मयूर टिळेकर ,आनंदा काळोखे, अनिल विधाटे, सचिन विधाटे, रामदास काळोखे, महिला रा.काँग्रेसच्या दीपाली पिंजन,जयश्री केदारी, अनिता सामे, सुगंधा करांडे, आम्रपाली ओहाल इत्यादी अनेक महिला आणि कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी गर्दीमुळे काही काळ वाहतुक विस्कळीत झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *