Dehugaon News : श्री संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचा वापर करून वादग्रस्त पोस्ट; अभिनेत्री केतकी चितळेवर गुन्हा दाखल करा
जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थानतर्फे देहूरोड पोलीस ठाण्यात निवेदन

Pckhabar- अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबात सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट लिहिली होती. त्यामध्ये तिने लिहिलेल्या ओळींमध्ये “तुका म्हणे” या शब्दाचा वापर केला आहे. या शब्दांवरून जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थानने चितळेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

याबाबत संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, अभिनेत्री केतकी चितळे यांनी समाजमाध्यमांत ‘तुका म्हणे’ या शब्दांचा वापर करून वादग्रस्त व विटंबनात्मक लेखन केले. श्री संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायाचे पूजनीय श्रद्धास्थान आहे. ‘तुका म्हणे’ ही संत तुकाराम महाराजांची नाममुद्रा असून महाराजांनी लिहिलेल्या सर्व अभंगांची स्वाक्षरी आहे. श्री संत तुकाराम महाराजच नव्हे तर देशातील सर्व संतांच्या नावांचा वापर करून जर कोणी असे वादग्रस्त व विडंबनात्मक लिखान करत असेल तर त्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच चितळेवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, पवार यांच्यावर शेलक्या भाषेत सोशल माध्यमांवर टीका केल्यामुळे अभिनेत्री चितळे चांगलीच अडचणीत आली आहे. तिच्यावर राज्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिला ठाणे सत्र न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.










Leave a Reply