Dehugaon News: श्री गजानन महाराज यांच्या जन्मतिथीनिमित्त देहूत उद्या अग्निहोत्र ध्यान, व्याख्यानाचे आयोजन
उद्योजक विशाल परदेशी यांची माहिती

Pckhabar-श्री गजानन महाराजांच्या जन्मतिथीनिमित्त श्री स्वामी समर्थ चिन्मय पादुका मठ गुरू मंदिर (बाळप्पा मठ) व विश्व फाऊंडेशन शिवपुरी यांच्या वतीने देहूगावात उद्या (सोमवार) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

देहूमधील गाथा रोडवरील भंडारा डोंगर दिंडी समाज येथे हा कार्यक्रम सायंकाळी सहा वाजल्यापासून होणार आहे. यावेळी सातारा येथील छत्रपती शिवाजीराजे भोसले, वृषालीराजे भोसले, आमदार सुनील शेळके, नगरसेविका पोर्णिमा परदेशी व उद्योजक विशाल परदेशी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यामध्ये सामूहिक अग्निहोत्र ध्यान, नामस्मरण व महाआरती होणार आहे. सायंकाळी सहा वाजता गजानन महाराज यांच्या पादुका आगमनाने या कार्यक्रमाला सुरूवात होणार आहे. त्यानंतर भक्तीसंगिताचा कार्यक्रम होईल. याशिवाय अग्निहोत्र प्रज्वलन, सामूहिक अग्निहोत्र व ध्यान असे कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. डॉ. पुरूषोत्तम राजमीवाले यांचे ‘अग्निहोत्र जीवनशैली’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल. देहू परिसरातील जास्तीत-जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन उद्योजक विशाल परदेशी यांनी केले आहे.










Leave a Reply