
Pimpri News : रोटरी क्लब ऑफ आकुर्डीतर्फे जनप्रबोधिनी इंग्लिश मिडियम स्कूलला सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिग मशीन
Pckhabar- रोटरी क्लब ऑफ आकुर्डी यांच्यातर्फे जनप्रबोधिनी इंग्लिश मिडियम स्कूल चिखली या शाळेत शिकणाऱ्या मुलींना अत्यंत उपयुक्त अशी सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिग मशीन व इन्सिनेटर मशीन लावण्यात आली.

या मशीनमुळे शाळा चालू असताना अचानक मासिक पाळी आल्यास सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध होतील. तसेच वापरलेले नॅपकीन इकडे तिकडे फेकून दुर्गंधी पसरण्या पेक्षा त्याची विल्हेवाट लावण्यासाठी मदत होईल.
या प्रोजेक्टमुळे शाळेत शिकणाऱ्या 600 विद्यार्थीनीना फायदा होईल. या कार्यक्रमासाठी क्लबतर्फे पी आय डायरेक्टर सौ सीमा शर्मा व अँडमीन डायरेक्टर सौ आनंदिता मुखर्जी व रोटेरियन श्री अशोक मेहेर व अँन सौ वृषाली मेहेर उपस्थित होते.










Leave a Reply