Talegaon Dabhade News : तळेगाव दाभाडेत प्रारूप प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

Pckhabar- सार्वत्रिक निवडणूक २०२२च्या अनुषंगाने ब वर्ग नगरपरिषदांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकांची कार्यवाही त्वरित सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यास अनुसरून तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर आक्षेप आणि हरकतींपासून प्रभाग रचनेच्या अनुषंगाने सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

१० ते १४ मे दरम्यानच्या कालावधीत तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या प्रारूप प्रभागरचनेबाबत नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या आहेत. प्रभाग रचनेबाबत प्राप्त झालेल्या हरकती आणि सूचनांवर २३ मेपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडून सुनावणी होणार आहे. प्राप्त हरकती आणि सूचनांच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ३० मे पर्यंत अभिप्राय देऊन राज्य निवडणूक आयुक्त यांच्याकडे अहवाल पाठवला जाईल. त्यानंतर ६ जूनला राज्य निवडणुक आयुक्त अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देतील.
येत्या ७ जूनला प्रभागनिहाय एकूण लोकसंख्या, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीची लोकसंख्या आदींचा उल्लेख असलेली अंतिम प्रभाग रचनेबाबतची अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत स्थानिक पातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय आणि नगरपरिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी दिली.










Leave a Reply