Pimpri News: बंधुता काव्य महोत्सवाच्या अध्यक्षपदी शंकर आथरे

Pimpri News: बंधुता काव्य महोत्सवाच्या अध्यक्षपदी शंकर आथरे

Pckhabar- राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेच्या वतीने पुढील महिन्यात होणाऱ्या एक दिवसीय बंधुता काव्य महोत्सवाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध निवेदक व शिक्षक शंकर आथरे यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी दिली.

शंकर आथरे गेल्या तीन दशकांहून अधिक काळ बंधुता चळवळीमध्ये सहभागी आहेत. बंधुताच्या विविध कार्यक्रमांमध्ये व उपक्रमांमध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांचा ‘वसुंधरा’ हा काव्यसंग्रह लोकप्रिय झाला असून, ‘द्वारका’ ही कादंबरी प्रकाशनाच्या मार्गावर आहे. त्यांनी दुसऱ्या विद्यार्थी शिक्षक साहित्य संमेलनाचेही अध्यक्षपद भूषविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *