Dehugaon News : देहू राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश हगवणे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, महिलांसाठी आरोग्य तपासणी

Dehugaon News : देहू राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश हगवणे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद, 222 जणांनी केले रक्तदान

Pckhabar- राष्ट्रवादी काँग्रेसचे देहूगाव शहराध्यक्ष प्रकाश हगवणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात 222 जणांनी रक्तदान केले. तसेच 103 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

देहूगाव येथे आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिर आणि आरोग्य तपासणी शिबिराला मावळचे आमदार सुनील शेळके, शहराध्यक्ष प्रकाश हगवणे, नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, उपनगराध्यक्षा रसिकाताई काळोखे, माजी उपसरपंच स्वप्निल आप्पा काळोखे, विशाल परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.


222 लोकानी रक्तदान केले. 103 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. अक्षय ब्लड बँक हडपसर यांनी रक्तसंकलन केले. डॉ. सुदर्शन घेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली देहू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येलवाडी यांनी मदत केली.


देहूच्या नगराध्यक्षा स्मिता चव्हाण यांनी स्वतः रक्तदान करून जनतेला आदर्श घालून दिला. मयूर टिळेकर व नगरसेवक रोहित काळोखे यांनी देखिल रक्तदान केले आम्ही देहूकर परिवार, देहू ट्रेकर्स या सामाजिक संघटनांनी चांगला प्रतिसाद दिला . प्रत्येक रक्तदान करणार्‍या व्यक्तीला टि शर्ट देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *