Dehugaon News : श्रीक्षेत्र देहूतील अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

Pckhabar- श्रीक्षेत्र देहू मध्ये शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० पासून सृजन फाउंडेशनच्या माध्यमातून अभंग इंग्लिश मिडीयम स्कूल सुरू करण्यात आले आहे. कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे महाराष्ट्र दिन साजरा करता आला नाही. परंतु या वर्षी मोठ्या उत्साहात महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.

औद्योगिक क्षेत्रात सातत्याने अग्रेसर असल्यामुळे महाराष्ट्र राज्य हे आजही देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य म्हणून गणले जाते. म्हणूनच अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये संपन्न होत असलेल्या या पहिल्या महाराष्ट्र दिनाचे ध्वजवंदन ‘काटे फूड इंडस्ट्रीज’ या उद्योग समूहाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण दर्जा निर्माण करणारे यशस्वी उद्योजक श्री. राजेंद्र काटे व श्री.रमेश काटे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रा. डॉ. बाजीराव शिंदे, प्रा. डॉ. वसंतराव गावडे, ॲड. संजय भसे, माजी उपसरपंच सचिन कुंभार, श्री. कार्तिक अय्यर, वसंत भसे, चंदन सुतार, शिवाजी टिळेकर, तात्यासाहेब पचपिंड तसेच सृजन फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील कंद, सचिव प्रा. विकास कंद, संचालक प्रशांत काळोखे, सौरभ कंद आदी मान्यवरांसह पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

शाळेचे प्रशस्त मैदान, शाळेची इमारत हे सर्व पाहूनच शाळेच्या गुणवत्तेचा अंदाज येतो. महाराष्ट्रात जन्म घेतलेले आपण सारेच भाग्यवान आहोत. आजही महाराष्ट्राची ओळख शाहू, फुले, आंबेडकर यांचा महाराष्ट्र अशीच आहे. कारण शाहु-फुले-आंबेडकर यांनी दूरदृष्टीने शैक्षणिक क्षेत्रात भरीव असे कार्य केले आहे. सर्वांगीण विकासासाठी मुलांमध्ये अभ्यासक्रमासोबतच वैचारिक मूल्ये रुजवावीत, मुलांमध्ये विवेक जागृत करण्यात यावा असे मत श्री. रमेशशेठ काटे यांनी यावेळी व्यक्त केले. मुलांमधील अज्ञानाची काजळी दूर करून त्यांना विवेकाचा प्रकाश दाखवावा असे मत प्रा. विकास कंद यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

उद्योगक्षेत्रात जाणीवपूर्वक पाऊल ठेवत, अथक परिश्रम, प्रामाणिकता, अभ्यासपूर्ण नाविन्याचा शोध घेण्याची वृत्ती व नवनवीन आव्हानांना धैर्याने सामोरे जात ‘काटे फूड इंडस्ट्रीज’ नावाचा गुणवत्तेचा दर्जा उद्योगविश्वात निर्माण करून मराठी माणूस देखील यशस्वी उद्योजक होऊ शकतो याचा आदर्श निर्माण करणारे ‘काटे फुड इंडस्ट्रीज’ चे संचालक श्री राजेंद्रजी काटे व श्री रमेशशेठ काटे यांचा महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सृजन फाउंडेशनच्यावतीने ‘सन्मानपत्र’ प्रदान करून ‘विशेष गौरव’ करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या डॉ. कविता अय्यर मॅडम यांनी केले . सहशिक्षिका सौ. वृषाली आढाव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सहशिक्षिका सौ. योगिता नांगरे मॅडम यांनी आभारप्रदर्शन केले.










Leave a Reply