Pimpri News : आवडत्या वाहन क्रमांकांसाठी नागरिकांनी मोजले १३ कोटी रुपये

Pckhabar- नवीन वाहन खरेदी केल्यानंतर प्रत्येकाला आपल्या नवीन वाहनाचा क्रमांक आवडीचा आणि सहजरीत्या लक्षात राहण्यासारखा मिळावा, असे वाटते. त्यामुळेच आरटीओ कार्यालयात ‘चॉइस नंबर’ मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे. या सुविधेचा पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी लाभ घेतला.

परिवहन कार्यालयात आकर्षक क्रमांक मिळावा म्हणून वर्षभरात १३ हजार ७८२ नागरिकांनी अर्ज केले होते. यांतून आवडता क्रमांक मिळावा म्हणून शहरातील नागरिकांनी वर्षभरात तब्बल १३ कोटी ८१ लाख ३४ हजार ५०० रुपये मोजले आहेत.
परिवहन विभागाकडून आकर्षक क्रमांकांचा लिलाव केला गेला. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून आकर्षक क्रमांकांची सीरिज उपलब्ध झाली होती. तसेच वाहनधारकांना त्यांच्या पसंतीनुसार क्रमांक ‘चॉइस’ करण्याची मुभा देण्यात आली होती. त्यासाठी शुल्क आकारण्यात आले. आवडत्या क्रमांकांसाठी शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पैसे मोजले. आवडत्या क्रमांकासाठी तीन हजारांपासून ते साडेचार लाखांपर्यंत नागरिकांनी पैसे मोजले आहेत. यावरून मनाप्रमाणे नंबर मिळावा म्हणून कितीही पैसे मोजायला नागरिक तयार होत असल्याचे दिसून येते.
” परिवहन विभागातर्फे वाहनचालकांना मनाप्रमाणे आवडता क्रमांक दिला जातो. याला शहरातील वाहनचालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उपलब्ध असलेल्या सीरिजमधून ‘चॉइस’ क्रमांक दिला जातो.
– अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.










Leave a Reply