Pimpri News : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आज पिंपरीतील वाहतुकीत बदल

Pckhabar- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज (गुरुवार) अभिवादन करण्यासाठी पिंपरी चौकात मोठ्या संख्येने अनुयायी येतात. त्यामुळे गुरुवारी दुपारी तीन वाजल्यापासून पिंपरी चौकातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत.

चिंचवड स्टेशनकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरीकडे सेवारस्त्याने येणारी वाहतूक बंद करून डी-मार्ट ग्रेडसेपरेटरमध्ये वळविण्यात येणार आहे. नाशिक फाट्याकडून डॉ. आंबेडकर चौक, पिंपरीकडे सेवारस्त्याने येणारी वाहतूक बंद करून डेअरी फार्म ग्रेडसेपरेटर व एचपी पंप खराळवाडी ग्रेडसेपरेटरमध्ये वळविण्यात येणार आहे. तसेच इंदिरा गांधी पूल ते डॉ. आंबेडकर चौक पिंपरीकडे येणारा मार्ग बंद करून ही वाहतूक लिंक रोडकडे वळविण्यात येणार आहे.
नेहरूनगर चौकाकडून डॉ. आंबेडकर चौक, पिंपरीकडे येणारी वाहतूक बंद करून एच. ए. कॉर्नर बसस्टॉप येथून मासूळकर कॉलनीकडे वळविण्यात येणार आहे. तसेच सम्राट चौक ते अहिल्यादेवी चौक पिंपरीदरम्यानचा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे. गुरुवारी दुपारी तीन ते मध्यरात्रीपर्यंत वाहतुकीमधील हे बदल राहणार आहेत, अशी माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिली.










Leave a Reply