Dehugaon News : संत तुकाराम महाराज संस्थानचे माजी विश्वस्त अभिजीत मोरे व नगरसेविका प्रियांका मोरे यांच्या वतीने घरोघरी अभंग लावण्याचा संकल्प

कै. नामदेव भागूजी हगवणे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त स्तुत्य उपक्रम
अभंग प्रतिष्ठानच्या अभंग घरोघरी या उपक्रमाचे स्वागत

Pckhabar- शब्दची आमुच्या जीवाचे जीवन… शब्दे वाटू धन जनलोका… जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थानचे माजी विश्वस्त अभिजीत मोरे व नगरसेविका प्रियांका अभिजीत मोरे यांच्या वतीने कै. नामदेव भागूजी हगवणे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त अभंग प्रतिष्ठानच्या अभंग घरोघरी या उपक्रमाचे स्वागत करीत आपल्या प्रभागात घरोघरी अभंग लावण्याचा संकल्प केला आहे.

आपल्या आदरणीय वडिलांच्या स्मरणार्थ अभंग विचार घरोघरी देण्याचा हा भक्तिपूर्ण संकल्प आदर्शवत आहे. ऐसी कन्या व्हावी कुळी..करी भक्तीची दिपवाळी…हे संतवचन आपल्या जीवनातून साकारणारे हे कार्य आहे. या संकल्प कार्याचे मनापासून कौतुक समाज मनातून होत आहे. सत्य संकल्पाचा दाता नारायण… पूर्ण करी सर्व मनोरथ…











Leave a Reply