Maval News : पायपीट करणाऱ्या 50 विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ आकुर्डीतर्फे सायकल भेट

Maval News : पायपीट करणाऱ्या 50 विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ आकुर्डीतर्फे सायकल भेट

डिस्ट्रिक्ट गव्हर्नर पंकज शहा यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

Pckhabar- मामासाहेब मोहोळ हायस्कूल पाळू ही शाळा खेड तालुक्यातील अत्यंत दुर्गम भागात आहे. रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर श्री पंकज शहा यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील गरीब विद्यार्थ्यांनींसाठी 50 सायकल ‘रोटरी क्लब ऑफ आकुर्डी’ यांच्या तर्फे भेट देण्यात आल्या.

विद्यार्थीनी दुर्गम भागातून सुमारे 8 ते 10 किलोमीटर पायपीट करत येतात. या सायकलीं मुळे विद्यार्थ्यांनींचा प्रवासाचा वेळ वाचेल व त्या अभ्यासा साठी जास्त वेळ देवू शकतील.

या कार्यक्रमा साठी रोटरी क्लब ऑफ आकुर्डी तर्फे अध्यक्ष श्री गौरव शर्मा, सेक्रेटरी रामेश्वर लाहोटी, प्रोजेक्ट डायरेक्टर शशिकांत शर्मा, मेंबरशिप डायरेक्टर सौ कल्याणी कुलकर्णी, पी आय डायरेक्टर सौ सीमा शर्मा, अँडमीन डायरेक्टर सौ आनंदिता मुखर्जी व अँना श्री शाम नाईकडे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *