Talegaon Dabhade News : महिलांना समानतेची वागणूक मिळण्यासाठी त्यांचा सन्मान, आदर होणे गरजेचे: आमदार सुनील शेळके

Talegaon Dabhade News :
महिलांना समानतेची वागणूक मिळण्यासाठी त्यांचा सन्मान, आदर होणे गरजेचे: आमदार सुनील शेळके

कर्तुत्ववान महिलांचा पुरस्काराने सन्मान

Pckhabar- स्वतःच्या पायावर उभे राहू पाहणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या पाठीशी अशा संस्था देखील नेहमीच उभ्या आहेत. महिलांना समाजात समानतेची वागणूक मिळण्यासाठी त्यांचा सन्मान आणि आदर होणे गरजेचे आहे, असे मत मावळचे आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केले.


तळेगाव दाभाडे शहरातील श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठान व रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘कर्तुत्ववान महिला पुरस्काराचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार दिगंबर भेगडे, डॉ.कृष्णकांत वाढोकर, राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, माजी नगरसेवक गणेश काकडे, ह.भ.प.पंकज महाराज गावडे, संस्थापक/अध्यक्ष संतोष खांडगे, प्रा.मिलिंद शेलार, ज्योतीताई शिंदे, रो.सुमती निलवे, रो.शबनम खान, रो.डॉ.वर्षा वाढोकर, रोटरीचे सर्व पदाधिकारी, मान्यवर उपस्थित होते.

आमदार सुनील शेळके पुढे म्हणाले, सामाजिक बांधिलकी जपत महिलांच्या उन्नतीसाठी निस्वार्थ भावनेने कार्यरत राहून विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या महिलांच्या कार्याचा गौरव होण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी असे पुरस्कार महत्वाचे ठरतात. आज सर्वच क्षेत्रांमध्ये महिला आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहेत.

सावित्रीबाई फुले महिला बचत गट माळवाडी यांना उत्कृष्ट महिला बचत गट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रीमती शांताबाई मोहन काकडे यांना शांताई आदर्श माता पुरस्कार, डॉ.वर्षा सत्यजित वाढोकर यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समाजरत्न पुरस्कार, तर कुलस्वामिनी महिला मंचच्या अध्यक्षा सौ.सारिका सुनिल शेळके यांना राजमाता जिजाऊ समाजरत्न महिला पुरस्कार, शैक्षणिक क्षेत्रातील योगदानासाठी श्रीमती कुसुम शिवाजी वाळुंज, सहकार क्षेत्र शबनम आमिन खान, साहित्यिक क्षेत्र सौ.ज्योती नागराज मुंडर्गी, वैद्यकीय क्षेत्र सौ.शोभा पोपट कदम, कृषी व उद्योग क्षेत्र सौ.सुरेखा मनोहर काशीद, संप्रदाय क्षेत्र श्रीमती चांगुणाबाई जगन्नाथ भेगडे व सांस्कृतिक क्षेत्र अंजली विवेक सहस्रबुद्धे यांना सन्मानित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *