
Pimpri News : रोटरी क्लब ऑफ आकुर्डीतर्फे स्वामी समर्थ हायस्कूलमध्ये सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिगं, इन्सिनेटर मशीन
Pckhabar- रोटरी क्लब ऑफ आकुर्डी यांच्या तर्फे आज ( शनिवार) रोजी स्वामी समर्थ हायस्कूल, भोसरी येथे शाळेत शिकणाऱ्या मुलींना अत्यंत उपयुक्त अशी सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिगं मशीन व इन्सिनेटर मशीन लावण्यात आली.

या मशीन मुळे शाळा चालू असताना मासिक पाळी आल्यास सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध होतील. तसेच वापरलेले नॅपकीन इकडे तिकडे फेकून दुर्गंधी पसरण्या पेक्षा त्याची विल्हेवाट लावण्यासाठी मदत होईल.
या कार्यक्रमासाठी क्लब तर्फे पी आय डायरेक्टर सौ सीमा शर्मा व मेंबरशिप डायरेक्टर सौ कल्याणी कुलकर्णी उपस्थित होते.










Leave a Reply