Chinchwad News: मोहननगर येथील जलतरण तलाव सुरु करा

Chinchwad News: मोहननगर येथील जलतरण तलाव सुरु करा

शिवसेना नगरसेविका मीनल यादव यांची मागणी

Pckhabar-सध्या तीव्र उन्हाळा सुरु झाला असून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे मोहननगर येथील  जलतरण  तलाव सुरु करण्याची मागणी शिवसेना नगरसेविका मीनल यादव यांनी केली आहे.

याबाबत यादव यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे ही,  कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून मोहननगर येथील जलतरण तलाव बंद आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. तसेच  तीव्र  उन्हाळा सुरु झाला आहे. त्यामुळे जलतरण तलाव सुरु करण्याची मागणी  नागरिकांकडून  करण्यात येत आहे. त्याची दखल घेत तातडीने जलतरण तलावाची दुरुस्ती  करून  हा  तलाव  नागरिकांसाठी सुरु करण्याची मागणी यादव यांनी निवेदनात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *