Pimpri News : दुचाकी रॅलीद्वारे शिवरायांना अभिवादन

Pimpri News : दुचाकी रॅलीद्वारे शिवरायांना अभिवादन
शिवसेना महिला आघाडीतर्फे शिवजयंती साजरी

Pckhabar-हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज  जयंती निमित्त शिवसेना महिला आघाडीच्यावतीने  दुचाकी रॅली काढून शिवरायांना आभिवादन केले.

तत्पूर्वी आकुर्डी येथील शिवसेना भवनात   शिवसेना शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले यांच्या उपस्थितीत शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले.

महिला शिवसैनिकांनी  पारंपरिक  वेशभूषा आणि भगवे फेटे बांधून  आकुर्डी येथील शिवसेना भवन ते निगडी यथील भक्ती शक्ती उद्यानापर्यंत  दुचाकी रॅली काढली.  जिजाऊ माँसाहेब व बाल शिवाजी यांची वेशभूषा करून घोड्यावर स्वार झालेली महिला आणि बालकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

पिंपरी चिंचवड शहर संपर्क संघटीका  वैशाली  सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा संघटीका  शैला खंडागळे, उपजिल्हासंघटीका वैशाली मराठे, शहर संघटीका उर्मिला काळभोर, नगरसेविका  मिनल यादव, पिंपरी विधानसभा संघटीका  सरीता साने, कल्पना शेटे, शैला पाचपुते, कामिनी मिश्रा, रूपाली आल्हाट, साधना काशिद, शिल्पा अनपन, मिनल दळवी, ज्योती भालके, बेबी सय्यद, अश्विनी खांडेराव, कोमल जाधव, मंदा फड, वैशाली काटकर, उज्वला सावंत, नसरीन शेख, कलावती नाटेकर, भाग्यश्री म्हस्के, वंदना वाल्हेकर आदींनी रॅलीत सहभाग नोंदविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *