Baramati News : आरोग्य तपासणीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Baramati News : आरोग्य तपासणीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

युवा नेते युगेंद्र पवार यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन

Pckhabar- शिवजयंतीचे औचित्य साधून येथील  बर्गे अँड बर्गे असोसिएटस व शिवाआज्ञा प्रतिष्ठान च्या माध्यमातून आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. युवा नेते युगेंद्र पवार यांच्या  आरोग्य तपासणीने शिबिराचा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर यशश्री फाऊंडेशनच्या महिलांनी  शिवरायांचा पाळणा गायला.

राष्ट्रवादी  युवती काँग्रेसच्या अध्यक्षा भाग्यश्री धायगुडे, नगरसेविका आरती शेंडगे, कृषी अधिकारी  सुप्रिया पवार, युवा नेते बबलू देशमुख, प्रसिद्ध व्यावसायिक प्रताप जाधव,  बारामती शहर पोलीस ठाण्याचे  पोलीस निरीक्षक  महाडिक  आदी उपस्थित होते.

लहान मुलांचे मर्दानी खेळ

यावेळी  लहान मुलांनी लाठी काठी, दांड पट्टा, तलवार ढाल आदी मर्दानी खेळ सादर केले.  अॅड सुप्रिया विशाल बर्गे यांनी महिलांना  सॅनिटरी पॅड आणि सॅनिटायझरचे   वाटप केले.  अॅड विशाल बर्गे यांनी पाहुण्यांचा  सत्कार केला. विशाल पाटील मित्र मंडळ आणि  किरण पवार  यांनी कार्यक्रमाच्या नियोजनात मोलाचा वाटा उचलला.

सरपंच छाया शितोळे यांचा गौरव

डॉ.  साकेत जगदाळे, डॉ.  अशोक देशपांडे, डॉ.  परमेश्वर गेडगे, जगन्नाथ जगताप यांनी आरोग्य तपासणीसाठी  योगदान दिले.  कुसेगावच्या ( ता. दौंड )  सरपंच छाया शितोळे यांचा सामाजिक कार्याबद्दल ऍड सुप्रिया बर्गे यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *