Pimpri News: पाणीपुरवठ्याच्या तक्रारींसाठी महापालिकेतर्फे हेल्पलाइन सुरू

Pimpri News: पाणीपुरवठ्याच्या तक्रारींसाठी महापालिकेतर्फे हेल्पलाइन सुरू

Pckhabar- चिंचवड महापालिकेकडे पाणीपुरवठ्यासंदर्भात विविध तक्रारी येत आहेत. त्यामुळे आगामी काळात पाण्याच्या तक्रारी त्वरित सोडविण्यासाठी महापालिकेमार्फत २४ बाय ७ एक स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी ७७२२०६०९९९ हा हेल्पलाइन क्रमांक देण्यात आला आहे. नागरिकांना या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढल्यामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होणे, गढूळ पाणी, व्हॉल्व लीकेज, पाइप लाइन फुटणे आदी प्रकारच्या तक्रारी विभागास प्राप्त होत आहेत. त्यास अनुसरून आगामी काळात पाण्याच्या तक्रारी त्वरित सोडविण्यासाठी महापालिकेमार्फत २४ बाय ७ एक

स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करण्यात आलेली आहे. त्यासाठी ७७२२०६०९९९ हा हेल्पलाइन क्रमांक देण्यात आलेला आहे.

महापालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांनी पाण्यासंदर्भात काही तक्रारी असतील तर त्या ७७२२०६०९९९ या क्रमांकावर फोन करून नोंदवाव्यात. या तक्रारींचे निरसन करण्यास पाणीपुरवठा विभाग कटिबद्ध आहे. आपल्या तक्रारीचे वेळेत निरसन होईल, याबाबत पाणीपुरवठा विभाग प्रयत्नशील राहील.

तसेच, उपलब्ध पाणी जपून वापरावे. घरातील, इमारतींमधील, हौसिंग सोसायट्यांच्या आवारातील पाण्याची गळती बंद करावी. पाण्याच्या टाक्या ओव्हर फ्लो होऊ नयेत यासाठी काळजी घ्यावी, तसेच रस्त्यावरील दृष्टिक्षेपातील पाणीगळतीबाबत महापालिकेस कळवावे, असे आवाहनही महापालिकेने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *