Talegaon Dabhade News: तळेगावमध्ये उद्यापासून स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेला सुरुवात 

Talegaon Dabhade News: तळेगावमध्ये उद्यापासून स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेला सुरुवात

Pckhabar- तळेगाव दाभाडे येथील श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठान व रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी यांच्या संयुक्तपणे उद्या (दि. 24) पासून स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेला सुरुवात होणार असून, या व्याख्यानमालेचा समारोप २६ मार्च होणार आहे, अशी माहिती मुख्य संयोजक संतोष खांडगे यांनी दिली.


मावळभूषण मामासाहेब खांडगे सभागृह, स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल येथे दररोज सायंकाळी ४.३० वाजता व्याख्यान होणार आहे. आज गुरुवारी (दि.२४) शिवपूर्वकालीन भारत आणि आक्रमकांच्या लढायांचा इतिहास या विषयावर इतिहास संशोधक प्रा. डॉ. लहू गायकवाड यांचे व्याख्यान होणार आहे. इंद्रायणी औद्योगिक सहकारी सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार शेलार कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.
शुक्रवारी दि. 25 रोजी शिवकाळ ते भारताच्या स्वातंत्र्य काळापर्यंतच्या लढायांचा इतिहास या विषयावर प्रा. डॉ. प्रमोद बोराडे यांचे व्याख्यान देतील. इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.
शनिवारी स्वातंत्र्योत्तर भारत ते रशिया – युक्रेन युद्ध पार्श्वभूमी या विषयावर ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचे व्याख्यान होणार आहे. कलापिनी संस्थेचे अध्यक्ष विनायक अभ्यंकर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *