Pimpri News : कन्या विद्यालयात देणगीतून गणवेश वाटप कार्यक्रम

Pimpri News : कन्या विद्यालयात देणगीतून गणवेश वाटप कार्यक्रम

माजी मुख्याध्यापिका शारदा जाधव यांनी दिलेल्या देणगीतून 15 विद्यार्थिनींना गणवेशाचे वाटप

Pckhabar- रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालय पिंपरी वाघेरे या शाळेत आज (बुधवार) जागतिक हवामान दिन व शहीद दिन तसेच देणगी द्वारे गणवेश वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका जाधव शारदा यांनी त्यांच्यातर्फे विद्यालयातील गरीब व होतकरू 15 विद्यार्थिनींना गणवेशाचे वाटप केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्याध्यापिका शारदा शेटे यांनी जागतिक हवामान दिन व शहीद दिन त्यानिमित्त शुभेच्छा देऊन देणगीदार सौ. शारदा जाधव यांचे ऋण व्यक्त केले.

तसेच विद्यालयातील उपशिक्षक फुलसुंदर जी. टी यांची रयत शिक्षण संस्थेच्या लाईफ वर्करपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले.

शारदा जाधव यांनी मनोगतातून बोलताना प्रतिकूल परिस्थिती वर मात करून विद्यार्थ्यांनी यश संपादन करावे असे सांगितले.

विद्यालयाच्या पर्यवेक्षिका उर्मिला पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीनल साकोरे यांनी केले. यावेळी विद्यालयातील अध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *